बीड दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
अर्जुन दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज दुपारी चीचखंडी (Beed News) शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. मुलाचा खून नेमका कोणत्‍या कारणामुळे झाला, याचा शोध पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here