बीड मजुराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

बीड : बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
आई-वडील कामाला गेल्याची संधी साधत, घरातून फरफटत ओढत नेत, शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन, 3 नराधम तरुणांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तर यावेळी एका महिलेने, तिचे नग्न अवस्थेतील फोटोही काढले आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे.

शुक्रवारी सकाळी आईवडील शेतात कामाला गेल्याने, त्यांची 17 वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.
तर या दरम्यान एका महिलेने सामूहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले.

या घटनेमुळे दिंद्रुड परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून, दिंद्रुड पोलीस ठाण्यात एका महिलेसह महादेव सुधाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ आणि अक्षय अर्जुन फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नराधम आरोपी फरार होण्यापूर्वी सापळा रचत पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्यासह टीमने, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन नराधमांना तात्काळ जेरबंद केले आहे.
अशा काळीमा फासणाऱ्या घटना बंद होण्यासाठी, पोलीस प्रशासन आणि सरकारने आता गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here