ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा,शेकडो प्रेक्षक स्टेजवर,रस्त्यालगत 1 तास ट्रॅफिक जाम

बीड : आपल्या अदानी तरुणांना घायाळ करणारी गौतम पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. बीडमध्ये एका कार्यक्रमात तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, अचानक शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले त्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला.
एवढच काय तर रस्त्यालगत 1 तास ट्रॅफिक जाम सुद्धा झालं होतं. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. बीड शहराजवळील बीड -परळी राष्ट्रीय महामार्ग लगत घोडका राजुरी शिवारात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बारमालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटील हिला बोलावण्यात आले होते. आता गौतमी पाटील शहरात आल्यावर म्हटल्यावर तरुणांची एकच झुंबड उडाली. एक दोन ठसेबाज लावण्या झाल्या. मग काय तरुण आऊटऑफ कंट्रोल झाले.

चालू कार्यक्रमात शेकडो लोक स्टेजवर चढल्याने गोंधळ उडाला. यावेळी स्टेजवर दगडफेक झाल्याच प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमांत एकच गोंधळ उडाला. यात गौतमी पाटील सुखरूप आहे.
मात्र चालू कार्यक्रम बंद करण्याची नामुष्की आयोजकावर ओढवली. विशेष म्हणजे, ऐन रस्त्यालगत कार्यक्रम असल्याने बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 तास ट्रॅफिक जाम झाली होती. तसंच गौतमीला पाहण्यासाठी काही हौशी तरुण झाडावर चढले होते. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमा परवानगी दिली कोणी हा प्रश्न उपस्थित होत आहे. गोंधळ आणि धिंगाणा झाल्याने पोलिसांनी गोंधळ थांबवून ट्रॅफिक पूर्ववत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button