रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या महिलेला गरोदर करून तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गर्भपात केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, तुला घर देईल असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यातून महिला गरोदर राहिली त्यानंतर महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता वारंवार करून महिलेच्या पोटात लाथ मारून गर्भपात केला. तू जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना ठेवणार नाही असे धमकावले. मात्र त्रास असह्य झाल्यावर महिलेने पोलिसात धाव घेतली.
महिलेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कांबळे याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरम्यान कांबळे याची पक्षातून पाच वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे या घटनेची औरंगाबाद परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. पोलिसात तक्रार दिल्याने याप्रकरणाची उकल झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here