पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीच्या पोटात चाकू भोसकून हत्या

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जावयाने सासूच्या घरात घुसून पत्नीवर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीच्या पोटात चाकूने भोसकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील रूमचे कागदपत्रे घेऊन आल्याने पती व पत्नीत वाद होत होता. त्यातच आरोपी पतीने पत्नी निलोफरला तलाक व मुंबई येथील रूमचे कागदपत्रे देणेसाठी वारंवार तगादा लावला होता.

ठाणे : पत्नीच्या मागे तलाक देण्यासाठी पतीने तगादा लावला होता. मात्र पत्नी तलाक देण्यास नकार देत असल्याच्या वादातून जावयाने सासूच्या घरात घुसून पत्नीवर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न (ttempted murder of wife) केला. तर पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीच्या पोटात चाकूने भोसकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटना बदलापूर पश्चिम भागातील एका घरात घडली असून याप्रकरणी हल्लेखोर पतीवर मेव्हणीच्या हत्येसह पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. मोहमद आयुब अब्दुल रशीद शेख( वय ५०, रा. मस्जिद बंदर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. सनोबर फत्ते मोहम्मद सय्यद, (वय ३०) असे हत्या झालेल्या मेव्हणीचे नाव आहे. तर निलोफर असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.
आरोपी मोहमद आयुब शेख हा मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात राहतो. काही वर्षांपूर्वी बदलापूरात राहणाऱ्या निलोफरशी त्याचा निकाह झाला होता. मात्र काही घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. त्यामुळे पत्नी निलोफर ही बदलापूरला माहेरी आईकडे राहत होती. येताना तिने मुंबईतील रूमचे कागदपत्रे घेऊन आल्याने पती व पत्नीत वाद होत होता. त्यातच आरोपी पतीने पत्नी निलोफरला तलाक व मुंबई येथील रूमचे कागदपत्रे देणेसाठी वारंवार तगादा लावला होता
मात्र तलाक आणि रूमचे कागदपत्रे देण्यास पत्नी नकार देत होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पती हा पत्नी राहत असलेल्या माहेरच्या घरी २८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास आला. त्यानंतर पत्नीची आई फरीदा सय्यद, (वय ६०) यांच्याशी घरातच भांडण करून सासूच्या तोडांवर, पोटावर चाकुने वार करू लागल्याने फिर्यादी यांची मुलगी सनोबर आणि आरोपीची पत्नी निलोफर या भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्या असता, आरोपीने धारदार चाकू मेव्हणी सनोबर हिच्या पोटात भोसकून तिला ठार मारले. तसेच पत्नी निलोफर हिचेही पोटावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल : दरम्यान आरोपीची सासू फरीदा सय्यद यांच्या तक्रारीवरुन आरोपी मोहमद आयुब अब्दुल रशीद शेखवर भा.द.वि. कलम 302,307,324,504, 506 सह म.पो. का. कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here