अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवून,मित्राच्या बायकोवर वारंवार बलात्कार..

लातूर : गावातील सप्ताहाच्या कार्यकमाला घरी आलेल्या मित्राने, मित्राच्याच बायकोचा बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवितो, असे दोन म्हणत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.सदर घटनेची माहिती पीडित विवाहितेने पतीला दिल्यानंतर या तरुणाविरुद्ध अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगा येथील रहिवासी असलेला स्वप्नील राजेंद्र टाकळे याचा मित्र अहमदपूर तालुक्यातीलच एका गावात वास्तव्यास आहे. मित्राच्या गावात सप्ताहाचा कार्यक्रम असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी स्वप्निल मित्राच्या गावात गेला होता.

यावेळी मित्राच्या घरात गेल्यानंतर त्याची बायको बाथरुममध्ये अंघोळ करीत असताना त्याच्या नजरेस पडली. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेचा (Crime) व्हिडीओ बनवला. काही दिवसानंतर हा व्हिडीओ विवाहितेला दाखवून त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवतो असे म्हणत त्याने दमदाटी करु लागला.
याच व्हिडीओचा फायदा घेऊन आरोपी स्वप्निल याने आपल्याच मित्राच्या बायकोवर वारंवार बलात्कार केला. दिवसेंदिवस आरोपीचं स्वप्नीलचे कृत्य वाढतच गेल्याने पीडितेने अखेर घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.

पत्नीवर आपल्याच मित्राने बलात्कार केल्याचं कळताच, पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीला सोबत घेत थेट अहमदपूर पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here