माणुसकीला काळीमा,सहा वर्षीय चिमुलीवर अत्याचार

माणुसकीला काळीमा फासणारी घटना वर्ध्यात घडली आहे. वर्ध्याच्या सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय चिमुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटनेने जिल्हाभर संताप व्यक्त केला जात आहे. घटनेतील आरोपी पीडित मुलीचा शेजारी असून नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या मुलासोबत खेळण्यासाठी गेली असता आरोपीने हे संताप जनक कृत्य केलं आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या 40 वर्षीय नाराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आणि आरोपीचे घर हे एकमेकांच्या शेजारी असून पीडित चिमुकली ही आरोपीच्या घरी त्याच्या मुलासोबत नेहमी खेळायला जायची. दरम्यान नेहमीप्रमाणे काल देखील ती आरोपीच्या घरी त्याच्या मुलासोबत खेळायला गेली होती. यावेळी 40 वर्षीय नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेत चिमुकली प्रचंड घाबरली होती. तिची आई आंघोळ घालण्यासाठी आरोपीच्या घरी तिला घ्यायला गेली असता तिला याबाबतची शंका आली. पीडितेच्या आईला संशय आल्याने तिने मुलीला विचारपूस केली असता संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने आरोपीला याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे पीडितेच्या आईने सावंगी मेघे पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे..

घटनेची माहिती मिळताच डीवाईएसपी पियुष जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांनी परिस्थितिचा आढावा घेत संबंधिताना निर्देश दिले. या प्रकरणात 40 वर्षीय आरोपी विरुद्ध विविध कलामांअतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली. पुढील तपास पीएसआय रुचिरा पात्रे, पीएसआय अनुराधा फकटकर करीत आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. संशयितावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेली स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here