15.2 C
New York
Tuesday, April 16, 2024

Buy now

भारत जगातील पहिल्या 5 परकीय चलन साठ्यासह देशांच्या यादीतून बाहेर

- Advertisement -

परकीय चलनाच्या बाबतीत जगातील अव्वल ६ देश :
चीन ३.२२ ट्रिलियन डॉलर
जपान १.२९ ट्रिलियन डॉलर
स्वित्झर्लंड ९६१,३७२ अब्ज डॉलर
रशिया ५,४९,७०० अब्ज डॉलर
तैवान ५,४५,४८० अब्ज डॉलर
भारत ५,३७,५१८ अब्ज डॉलर

- Advertisement -

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात पुन्हा एकदा घट झाली आहे. त्यात सलग आठव्या आठवड्यात घट नोंदविण्यात आली आहे. या घसरणीतील सर्वात मोठी घट परकीय चलन मालमत्तांमध्ये (एफसी) नोंदविण्यात आली आहे.
या घसरणीनंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात ८.१३४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ऑगस्ट २०२० नंतर परकीय चलन साठ्याची ही नीचांकी पातळी आहे. या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर भारत आता जगातील पहिल्या 5 परकीय चलन साठ्यासह देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.

- Advertisement -

देशाच्या हितासाठी मजबूत परकीय चलन साठा :
परकीय चलनाचा भक्कम साठा असलेल्या देशाची आर्थिक स्थितीही चांगली मानली जाते. असे घडते कारण जगात एखादी समस्या निर्माण झाली, तर तो देश अनेक महिने त्याला लागणाऱ्या वस्तू सहजपणे मागवू शकतो. त्यामुळेच जगातील अनेक देश आपला परकीय चलन साठा अतिशय मजबूत ठेवतात. परकीय चलन साठ्यातील निर्यातीव्यतिरिक्त, डॉलर किंवा इतर परकीय चलन परकीय गुंतवणुकीतून मिळते. याशिवाय परदेशात काम करणाऱ्या भारतातील लोकांनी पाठवलेले परकीय चलन हाही मोठा स्रोत आहे.

किती शिल्लक आहे परकीय चलन साठा :
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ८.१३४ अब्ज डॉलरने घटून ५३७.५१८ अब्ज डॉलरवर आला आहे. १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत हा साठा ५.२२ अब्ज डॉलरने घटून ५४५ अब्ज डॉलरवर आला होता.

२३ सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सप्ताहात परकीय चलन साठ्यात झालेली घट ही प्रामुख्याने परकीय चलन मालमत्ता (एफसीए) घटल्याने झाली आहे. एकूण परकीय चलन साठ्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. रिपोर्टिंग सप्ताहात परकीय चलनाची मालमत्ता ७.६८८ अब्ज डॉलरने घटून ४७७.२१२ अब्ज डॉलरवर आली आहे. डॉलरच्या दृष्टीने व्यक्त केलेल्या परकीय चलन साठ्यात असलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेत युरो, पौंड आणि येन सारख्या बिगर-अमेरिकन चलनांमधील मूल्यवाढीच्या किंवा अवमूल्यनाच्या परिणामांचा समावेश होतो.

आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आढावा घेण्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या साठ्यातही घट झाली आहे. या काळात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 300 दशलक्ष डॉलरने घटून 37.886 अब्ज डॉलरवर आले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles