भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युथ विभाग तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी मिर्झा नदीम बेग यांची निवड

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युथ विभाग तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी मिर्झा नदीम बेग यांची निवड.

पत्रकारांच्या व जनसामान्य विद्यार्थी महिला व दिव्यांगच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया सदैव तत्पर -: मिर्झा नदीम बेग

भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी
यांच्या निर्देशानुसार
राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अरशद कच्छी
राष्ट्रीय उपाध्यक्ष युथ विभाग मोहम्मद अरबाज कच्छी
राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख मोहम्मद शोएब कच्छी

राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पठाण रफिक शेरखान यांनी औरंगाबाद येथील पत्रकार साप्ताहिक बीड गेवराई चे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी मिर्झा नदीम बेग
यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युथ विभाग तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे. प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश जितेंद्र माहोर व जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाकेकर व फोरम चे सर्व पदाधिकारी व साप्ताहिक बीड गेवराई संस्थापक चांद खां पठाण आणि सर्व सहकारी मित्र व पत्रकार बंधू-भगिनींनी यांनी निवड झाल्या बद्दल
मिर्झा नदीम बेग यांचे अभिनंदन फोन व मेसेज करून केले.
या निवडी बद्दल धन्यवाद देत प्रिंट तसेच सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकाराचे सहकार्य घेऊन
भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाची महाराष्ट्र प्रदेश युथ विभागची कार्यकारिणी चे मजबुती करण करून युथ विभागाचे राज्य कार्यकारणी प्रत्येक जिल्ह्यातून युथ विभाग अध्यक्ष कार्यकरणी तसेच जिल्ह्याची कार्यकारणी मजबूत करून पत्रकार व जनसामान्य व विद्यार्थी दिव्यांग बंधू आणि भगिनींना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी
राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अरशद कच्छी, राष्ट्रीय उपाध्यक्ष युथ विभाग मोहम्मद अरबाज कच्छी, राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख मोहम्मद शोएब कच्छी व
राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पठाण रफिक शेरखान यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे मिर्झा नदीम बेग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here