मटणाची भाजी कुत्र्याने खाल्ली वडिलांनी मुलीवर गोळी झाडल्यानंतर मुलगी ठार

उस्मानाबाद : कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बापाने गोळी झाडल्यानंतर काही वेळातच मुलीचा मृत्यू झाला आहे. सदर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) तुळजापूर तालूक्यातील कारला या गावात घडली आहे. सदर घटनेप्रकरणी सोमवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात मयत तरुणीच्या आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलगी ही विवाहित असून, काजल मनोज शिंदे असं तिचे नाव आहे.

अशी घडली संपूर्ण घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत काजल मनोज शिंदे ही विवाहित तरुणी तिच्या आई – वडिलांकडे माहेरी राहत होती. तिचा पती देखील तिच्या सोबतच राहत होता. तिच्या वडिलांनी घरी मटण आणले होते. त्या मटणाची भाजी काजलने बनवली होती. मात्र, काजलचे लक्ष इतर कामात असल्याने मटणाची भाजी कुत्र्याने खाल्ली. कुत्रा मटण खात असल्याचे काजलच्या आईने पाहिले आणि तीची आई काजलवर रागावली. यातून दोघीचे भांडण सुरु झाले. याच वेळी काजल तिच्या आईसोबत उलट भांडू लागली असता दारूच्या नशेत असलेले काजलचे वडील गणेश झंप्या भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीने काजलवर गोळी झाडली. जवळून गोळी लागल्याने काजल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
काजलच्या वडिलांनी काजलवर गोळी झाडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तिला तुळजापुर त येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तुळजापूर येथील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले. नातेवाईकांनी काजलला उस्मानाबाद येथे उपचारासाठी घेऊन निघाले असता वाटेतच काजलचा मृत्यू झाला. काजलच्या मृत्यूनंतर काजलच्या आई – वडिलांनी काजलचे पती मनोज शिंदे यांना देखील ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे काजलच्या पतीने सांगितले आहे. दरम्यान, मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन काजलच्या आई – वडिलांविरोधात कलम- ३०२, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत. दरम्यान, आरोपी गणेश भोसले हा फरार झाला असून, पोलिसांनी मीरा भोसले यांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here