क्राईमताज्या बातम्या

कोट्यवधींचे दागिने आणि दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पलायन


नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनेनं सासू सासऱ्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून प्रियकरासोबत पळ काढला आहे.
इतकंच नाही तर कोट्यवधींचे दागिने आणि दीड लाख रुपये घेऊन पलायन केले आहे. याप्रकरणी पतीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR In Police Station) दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. तक्रारकर्त्या पतीने पोलिसांना सांगितलं की, “पत्नीने आई-वडिलांच्या खोलीत कॅमेरे लावले होते. या माध्यमातून तिने आक्षेपार्ह व्हि़डीओ (Offensive video) चित्रित केला.” व्हिडीओची घटना उघड होताच आरोपी महिलेने घरातून एक कोटीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले.

तक्रारकर्त्याने पोलिसांना सांगितलं की, “त्याचे कुटुंब लक्ष्मीनगर परिसरात राहात असून चांदणी चौक परिसरात त्यांचा सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ आहे. त्याचं आणि भावाचं लग्न झालं आहे. भाऊ कुटुंबासह दुसऱ्या घरात राहतो, तर पीडित तरुण आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र जेव्हा दोघांमध्ये काही गोष्टीवरून भांडण व्हायचे तेव्हा ते वेगवेगळ्या खोलीत झोपायचे. 5 सप्टेंबर रोजी पीडितेने पत्नीच्या मोबाईलमध्ये एक अश्लील संदेश पाहिला जो महिलेच्या मित्राने पाठवला होता. यानंतर त्याने बाकीचे मेसेज वाचले, त्यावरून त्याला समजले की पत्नीचे मित्रासोबत अफेअर आहे.”
तक्रारीनंतर पोलिसांनी सांगितले की, ” महिलेचे महाविद्यालयीन मित्रासोबत गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर पीडित तरुणाने फोन करून तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले. याप्रकरणाची सर्व माहिती प्रियकराने त्याच्या पत्नी दिली त्यानंतर महिला घरातून दागिने आणि रोख घेऊन पळून गेले. यानंतर तिने पतीला धमकी दिली की, तू हे प्रकरण संपवलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन. माझ्याकडे त्याचे अश्लील व्हिडीओ आहेत.” पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *