हवेत उडणारी दुचाकी

जपानी कंपनीने बनवलेल्या दुचाकीची किंमत ६.१९ कोटी रुपये आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहाई कोमात्सु यांनी सांगितले की, ही दुचाकी जपानमध्ये विकण्यास सुरुवात झाली आहे. तर २०२३ पासून अमेरिकेत ती विकण्यास सुरुवात होईल. या देशांमध्ये या दुचाकीची विक्री यशस्वी झाल्यास २०२५ पासून भारत, चीन व अन्य देशातून ती विकण्यास सुरुवात होईल.

ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीने जपानच्या एका प्रदर्शनात डिजिटल पद्धतीने ही उडणारी दुचाकी सादर केली. त्यानंतर काही महिन्यानंतर त्याचे डेमो जनतेला दाखवण्यात आले होते.

रस्त्यावरील वाढती ट्रॅफिकची समस्या जगातील सर्वच शहरांना जाणवत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील ड्रेडाईड शहरात जपानच्या एरिवीन्स कंपनीने ‘उडणारी दुचाकी’ची (होवर बाईक) चाचणी केली.

या दुचाकीचे नाव ‘एक्सटुरिझ्मो’ असे आहे. ही उडणारी दुचाकी प्रत्यक्षात आल्यास वाहतुकीचे चित्रच बदलून जाणार आहे. ८० ते १०० किमी ताशी वेगाने धावणारी ही दुचाकी ३० ते ४० मिनिटे हवेत उडू शकते. ही दुचाकी लाल, निळ्या व काळ्या रंगात उपलब्ध आहे उड्डाण करताना ही बाईक १०० किलो वजन वाहून नेऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here