माजलगाव धरणात नित्यनियमाने पोहायला जाणाऱ्या डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय ४५ वर्षे ) यांचा रविवारी सकाळी आठच्या दरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे मात्र ते माजलगाव येथेच वास्तव्यास होते.
ते रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात असत, दररोजप्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांब गेले. परत येत असताना त्यांना दम लागून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. धरणामध्ये बुडालेल्या फपाळ यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी बीड येथील बचावकार्य पथकाला पाचारण केल्याची माहिती तहसीलदार वर्षा मनाळे यांनी दिली.