सातारा जिल्ह्यातील येणके (ता. कराड) गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते 75 स्तंभांवर ध्वजारोहण करण्यात आले.या ध्वजारोहणाची इंडिया बुक लिम्का बुकने देखील नोंद घेतली आहे.
सातारा सातारा जिल्ह्यातील येणके (ता. कराड) गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Amrit Mahotsava of Independence 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते 75 स्तंभांवर ध्वजारोहण flag hoisting करण्यात आले. विधवा प्रथा बंदीचा ठराव, हळदी-कुंकवाच्या उपक्रमानंतर येणके गावाने विधवांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या ध्वजारोहणाची इंडिया बुक Recorded in the India Book लिम्का बुकने देखील नोंद घेतली आहे.
75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण
ऐतिहासिक निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तीन हजार लोकसंख्या असलेल्या येणके गावात विधवा प्रथा बंदीचा Resolution against widow practice ठराव यापुर्वीच झाला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा 75 विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाने flag hoisting साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सोमवारी सकाळी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. भगवे फेटे बांधलेल्या 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण flag hoisting झाले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरीक, महिला आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.
इंडिया बुक, लिम्का बुकने घेतली नोंद आजवर देशात कुठेही विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र येणके गावाने एकाच विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोह करण्याऐवजी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले. या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक ध्वजारोहणाची नोंद इंडिया बुक, लिम्का बुकने घेतली आहे. लवकरच या सोहळ्याचे रेकॉर्डिंग घेऊन अधिकृतरित्या इंडिया आणि लिम्का बुकमध्ये या सोहळ्याची नोंद केली जाणार आहे.