पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोबोतच ऐतिहासिक इमरतींना सजवण्यात आले आहे. त्या ठिकाणी आकर्षक विदयुत रोषणाई देखील करण्यात आली आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये (Pandharpur) श्री विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple) विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांने देवाचा गाभारा, सोळाखांबी प्रवेश द्वार आणि सभामंडप सजवण्यात आला आहे. सभामंडपात तिरंग्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठलास पिवळा अंगारखा, जांभळे धोतर आणि तिरंग्याचे उपरणे असा पोशाख करण्यात आला आहे. तर संपूर्ण विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. तिरंग्यामध्ये सजलेले देवाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here