अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख आणि 5 किलो सोने मिळाले.

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने मिळाले.
हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.
खरेतर, शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने नुकतेच पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीची निकटवर्ती आहे. 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या फ्लॅटमधून 21 कोटींची रोकड आणि सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. अर्पिताला ईडीने २३ जुलै रोजी अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here