पोलिसांच्या घरात चोरी,रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा

सांगली : पोलिसांच्या घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे.चोरट्यांनी एकाच अपार्टमेंटमधील दोन पोलिसांचे बंद फ्लॅट फोडून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा केला. दोन फ्लॅटमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

कुपवाड रोडवरील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये काल (27 जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे संदीप मोरे आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पूजा खाडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. या दोन्ही चोरीची संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

संदीप मोरे हे ड्युटीवर पोलीस ठाण्यात असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेऊन मोरे यांचा पहिल्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सहा तोळे सोने आणि तीन हजार रोख रुपये चोरले. त्यानंतर चोरट्यांनी त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पूजा खाडे यांच्या घराचे लॉक तोडत घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here