बीडमध्ये खुनसत्र ! आणखी एका युवकाचा खून

कंदुरीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर तीन जणांनी जुण्या पत्याच्या वादातुन एका २५ वर्षीय व्यक्तीला लाथा बुक्याने मारहाण करत घरा समोरील रस्त्यावरील नालीवर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास शहरातील संजय नगर भागात घडली.

बाबु शिवराम शेनुरे वय २४ राहणार संजय नगर गेवराई असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नावं असुन तो फिरून भंगार घेण्याचा व्यावसाय करत होता.बुधवार रोजी आषाढ महिन्या निमित्त प्रत्येक घरी देवदेवाचा म्हणजे बोकडाचा कार्यक्रम असतो त्याच प्रमाणे बाबु शिवराम शेनुरे यांच्या घरी देखील कार्यक्रम होता.कार्यक्रम आटपुन सर्व पाहुणे आपआपल्या घरी गेले त्यानंतर बाबु शिवराम घरी झोपला होता.

सायंकाळी ६.३० च्या सुमारास आलेल्या पाहुण्या पैकी अंबादास व्यंकट शेनुरे राहणार संजय नगर गेवराई लालु व्यंकट शेनुरे व अशोक व्यंकट शेनुरे राहणार पाचोड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या तीन भावाने शिवराम शेनुरे यांना पहिल्यांदा मारहाण केली.नंतर बाबु शिवराम शेनुरे याला उठवुन जुण्या पत्याचा वादाचे कारण काढुन बाबु शेनुरेला तीन जणांनी हाताने लाथाने मारहाण करत घरा समोरील रस्त्यावरील नालीवर पडल्याने यात त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर हे तीघेही पळुन गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here