लक्ष्मी देवीची होईल कृपा ! सकाळी उठल्यावर करा या गोष्टी आणि व्हा चिंता मुक्त

समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमे॥ भारतीय प्राचीन परंपरामध्ये संस्कृती, संस्कार यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे ३३ कोटी देवता असल्याची मान्यता आहे.

जो तो आपापले कुळधर्म, कुळाचार, आराध्य देवता यांप्रमाणे विविध देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण करत असतो. सर्व देवतांमध्ये लक्ष्मी देवीला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी देवीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपण अनेकविध ग्रंथात विषद करण्यात आले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत अनेक गोष्टी समाविष्ट होत असतात. मात्र, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काही गोष्टी केल्यास त्याचा शुभ लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जाते.

खरे तर, शास्त्रानुसार पहाटेची ब्राह्ममुहुर्ताची वेळ शुभ मानली जाते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते. त्याच्या आयुष्यातून दुर्दैव दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते, असे मानले जाते. धार्मिक शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. असे केल्याने व्यक्तीचे नशीब पालटते. तसेच त्याचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो, असे सांगितले जाते.

लक्ष्मीची देवीचा प्रभावी मंत्र

धार्मिक शास्त्रांनुसार, एखाद्या व्यक्तीने सकाळी हात जोडून लक्ष्मीची देवीची प्रार्थना करावी, असे म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची देवीचा प्रभावी मंत्र म्हणताना तळहाताकडे पाहावे, असे सांगितले जाते. तो मंत्र म्हणजे, “कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम्।।”

नवग्रहांचा राजा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा

रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचे भांडे वापरावे. कारण तांब्याचा धातू सूर्यदेवाशी संबंधित आहे. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकते. सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा

शक्य असेल दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी टिकून राहते. तसेच दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. ज्या लोकांवर त्यांचे माता-पिता प्रसन्न असतात, त्यांच्यावर सर्व देवी-देवताही प्रसन्न होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here