फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देत राज्याची राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी सेना आमदारांसह पुकारलेले बंड यशस्वी ठरले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने कोसळले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी आम्ही शिवसेनेत आहोत व सेनेतच राहू अशी भूमिका सातत्याने मांडली होती.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देत राज्याची राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. दुसरीकडे यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेना विधिमंडळ पक्ष व भाजप विधिमंडळ पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगत शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना असल्याचं अधोरेखित केले.

शिंदे यांच्या या मंत्रिमंडळामध्ये फडणवीस हे कोणतेही पद घेणार नसून ते बाहेरून सरकारला मार्गदर्शन करतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी ही खेळी करत एकीकडे त्यांच्यावर होत असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेच्या आरोपांना सुरुंग लावला आहे तर दुसरीकडे शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना असेही दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here