8.4 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

- Advertisement -

आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कोरोना कालावधीत कोट्यावधी रूपयांचा कागदोपत्रीच खरेदी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आधिकारी-कर्मचा-यांनी नातेवाईकांच्या नावे बोगस एजन्सीच दाखवुन सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल विविध सामाजिक संघटना, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे गैरव्यवहार प्रकरणात चौकशी टाळणे तसेच तक्रारदारांना अहवाल देण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.९ मे सोमवार रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे “अंधेर नगरी चौपट राजा “या म्हणीचा प्रत्यय येत असून डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेधार्थ लाक्षणिक धरणे करण्यात येत आहे. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन,काॅक्रीट. भाऊराव.क.प.नेते काॅ.भाऊराव प्रभाळे, भा.क.प.नेते मोरे रामहरी,वाटमोडे श्रीहरी सहभागी आहेत. जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

कोरोना कालावधीत कंत्राटी कर्मचारी भरतीत गंभीर अनितमितता ,दोषीसिद्ध आधिका-यांवर गुन्हे दाखल करा.
____
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ कालावधीत वाढीव मनुष्यबळापेक्षा आधिकचे मनुष्यबळ जिल्हारूग्णालय डीसीएच बीड ६३ नर्सिंग हाॅस्टेल ५३ डीसीएच आयटीआय ०५ असे एकुण १२१ अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमितता तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन न करताच भरती करण्यात आली. रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करणे आदेशित असताना करण्यात आले नाहीत.दि.४ जुन २०२१ ते ११ जुन २०२१ नुसार बंद करण्यात आलेल्या संस्थामधील कंत्राटी कर्मचारी एकुण २१६ यांना देखील कामावरून कमी केले नाही त्यामुळेच सदरील कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन देण्यास अडचणी उदभवल्या परीणामी कर्मचाऱ्यांनी जिल्हारूग्णालय परीसरात उपोषण, निदर्शने करत आहेत. संबधित प्रकरणात डाॅ.राठोड, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक यांनी वाढीव मनुष्यबळापेक्षाही अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमिता करत ४४,३९९२ /- अतिरिक्त खर्च करून शासनास भुर्दंड सहन करावा लागला असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र असुन डाॅ.सुखदेव राठोड, डाॅ.महेश माने, डाॅ.ढाकणे दोषीसिद्ध असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे कळवले असुन संबधित प्रकरणात उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केली असून कंत्राटी भरती मध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून पात्र उमेदवार डावलुन भरती करण्यात आलेली आहे. संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा.

- Advertisement -

कोरोना कालावधीत खर्चाचे ऑडीट करा ;खरेदी गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करा
_____
बीड जिल्ह्य़ातील कोरोनाकाळात आरोग्य विभागाला दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी तसेच कर्मचारी, नातेवाईक यांच्या नावाने बोगस एजन्सीज दाखवुन आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून सीसीटीव्ही,रेमडीसिवीर इंजेक्शन, औषधे खरेदी, जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरण, प्रेरणा प्रकल्पातील गैरव्यवहार, जीवनामृत रक्तपेढीतील मनमानी कारभार, खरेदी कंत्राटामध्ये गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत .

बोगस कामांची देयके,अहवाल देण्यास टाळाटाळ जिल्हाधिकारी, उपआयुक्त यांच्या आदेशाची अवमानना प्रकरणात डाॅ.एकनाथ माले, डाॅ.सुरेश साबळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा
______
आरोग्य विभागातील विविध गैरव्यवहार प्रकरणात पुराव्यासह तक्रारीनंतर जिल्हाधिकारी बीड तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानंतर सुद्धा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असून संबधित प्रकरणातील अहवाल जिल्हाधिका-यांचे लिखित आदेश असताना सुद्धा तक्रारदारांना कळविण्यास टाळाटाळ केली जात देयके देऊ नयेत अशा तक्रारीनंतर सुद्धा बोगस कामांची देयके देण्यात आली असून एकंदरीतच भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी .

- Advertisement -

Related Articles

Latest Articles