आष्टीच्या अविनाश साबळेनी अमेरिकेतील तीस वर्षापूर्वी
चा विक्रम मोडीत काढला
बीड जिल्ह्यातील जनतेने अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा
आष्टी/ बीड ( गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मांडवा ( जिल्हा बीड ) येथील रहिवासी धावपटू अविनाश साबळे याने रीकेतील सन जुआन येथे झालेल्या राऊंड रनिंग मध्ये याने अमेरिकेतील तीस वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला .
विक्रम वीर अविनाश साबळे सध्या अमेरिकेत पुढील स्पर्धेसाठी तयारी करत असून सन जुआन कॉपीश्रोनो येथील स्पर्धेत त्याने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील बहादूर प्रसाद यांचे १९९२ सालचा विक्रम मोडीत काढला असून , त्याने हे अंतर अवघ्या १३:२५:६५ इतक्या वेळेत पूर्ण करून यापूर्वीचा विक्रम हा बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता . त्यांनी हे अंतर १३:२९:७० इतक्या वेळात पूर्ण केले होते .
अविनाश साबळे याने गेल्या वर्षी टोकीयो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ट्रिपल चेस या अडथळ्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता . देशात अविनाश साबळेनी धावण्याच्या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले असून मूळचा बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळेनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आर्मी मध्ये भरती होऊन पुढेही धावण्याच्या स्पर्धेत जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रवास चालूच ठेवून शाळा / महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना अनेक विक्रम प्रस्थापित केले .
आष्टीच्या अविनाश साबळेनी अमेरिकेतील तीस वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडीत काढल्याने अविनाश साबळे चे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक / सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय आदी मित्र परिवार यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .