चोरीच्या घटना वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्यरात्रीचे भारनियमन रद्द करा – युनुस शेख
बीड : ( गोरख मोरेे ) भारनियमनाचे पत्रक दि. ०७ एप्रिल २०२२ रोजी वाय. बी. निकम, कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय बीड यांनी भारनियमन संदर्भात काढलेले पत्रक. वाय. बी. निकम, कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय बीड यांच्या दि. ०७ एप्रिल रोजीच्या परिपत्रकानुसार भारनियमन करण्यात येत आहे परतलु त्यामध्ये भारनियमनाचे वेळापत्रक दिलेले नसुन मध्यरात्री भारनियमन करण्यात येत असून मध्यरात्री भारनियमन करण्यात येत असल्याने भविष्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण व शकते त्यामुळेच रात्रीचेभारनियमन रद्दबातल करण्यात यावे.तसेच सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सण तसेच १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदि कार्यक्रमांचा विचार करता तात्काळ भारनियमनाचे वेळापत्रक ठरविण्यात यावे.
अचानक सुरू झालेल्या भारनियमनामुळे ग्रामिण भागातील शेतक-यांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. भारनियमनया रद्द करा मागणीचे निवेदन देण्यात आले.