नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धसाठी बीड चा संघ रवाना

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धसाठी बीड चा संघ रवाना.

बीड : जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्लॅटफॉर्म वर खेळण्याची संधी मिळत नाही. फार कमी वेळा बीड जिल्ह्यातील खेळाडू राज्यस्तरीय किवा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना क्वचितच दिसतात. अशा होतकरू खेळाडूंना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आर्थिक परिस्थिती व परिस्थितीशी झगडावे लागते. अशा उत्कृष्ट खेळाडूंची प्रथमच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून निवड करून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट नाशिक येथे स्पर्धेत बीड जिल्ह्याचा संघ आज रवाना होत आहे. तुमचा भरणा असलेल्या संघाला साबिर कंट्रक्शन, आनंद हार्डवेअर तथा क्लोथ सेंटर, एस वैद्य ग्रुप पाटोदा कडून प्रायोजित करण्यात आले आहे. सामाजिक भान जपण्याचे काम या नामांकित संस्थांकडून करण्यात आले.
, जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे व्यवस्थापक सुशील तांबे, खेळाडू जालिंदर राजगुरू, वैजीनाथ नागरगोजे,सागर सानप, आदित्य जाधव, गजेंद्र गुंडाले,गणेश पवार , संजय गिते,पृथ्वी पाटील आकाश मोहोळकर,केदारनाथ येवले , अंमन पठाण,गणेश मोहिते,अभिमान सानप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here