विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

नीट युजी २०२२ १७ जुलै २०२२ रोजी होणार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू ,विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी MBBS,BDS,BAMS,BHMS,BUMS,BoTH,BPTH आणि B.Sc. Nursing या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस पात्र होण्यासाठी शैक्षिणक वर्ष २०२२-२३ साठी नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत National Eligibility- cum-Entrance Test [(NEET (UG)] – 2022 १७ जुलै रोजी होणार आहे यासाठी ०६ एप्रिल २०२२ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ०६ मे २०२२ रात्री ११.५० PM पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नीट युजी २०२२ नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट युजी २०२२ ही १३ भाषेमध्ये घेतली जाणार आहे.नीट फॉर्म मध्ये अपलोड करण्यासाठी लागणारी पुढीलप्रमाणे ओरिजिनल डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे. पासपोर्ट व पोस्टकार्ड (4×6) फोटो विथ व्हाईट बॅक ग्राऊंड पूर्ण नाव व फोटो काढलेला दिनांक,विद्यार्थ्याची सही(व्हाईट पेपर वर ब्लॅक पेन ने केलेली),विदयार्थ्याचा डाव्या व उजव्या हाताच्या सर्व १०बोटांची व्हाईट पेपर वर ठसे,उपलब्ध असेल तरसेंट्रल फॉरमॅट मधील कॅटेगरी सर्टिफिकेट (SC/ST/OBC/EWS),PwD सर्टिफिकेट, १०वी ची मार्कशीट व सनद (ज्यावर जन्म दिनांक लिहिलेला असावा.).तसेच नीट फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स(ओरिजिनल, झेरॉक्स किंवा मोबाईल मध्ये फोटो असेल तरी चालेल.) आधार कार्ड, १० वी मार्कशीट,११ वी मार्कशीट,१२वीमार्कशीट (रिपीटर साठी),१०,११,१२ वी शाळा व कॉलेजचे नाव,पत्ता व पिन कोड, अनुदानित किंवा विनाअनुदानित इत्यादी माहिती आवश्यक आहे.अर्ज नोंदणी साठी 1) General :- Rs.1600/-2) General-EWS/OBC-NCL :- Rs.1500/- 3) SC/ST/PwD/Third Gender :- Rs.900/- याप्रमाणे ऑनलाईन शुल्क आकारण्यात आले आहे. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी योग्य मार्गदर्शनानेच आपला अर्ज भरावा असे आवाहन सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांनी केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये होणाऱ्या सर्व मेडिकल व इंजिनीरिंग प्रवेश प्रक्रियेच्या Counseling रजिस्ट्रेशन सुरभी प्रवेश प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे सुरु झाले आहे त्यासाठी आता परळी व परिसरातील विद्यार्थ्यांना लातूरला जायची गरज नाही याची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. लातूरप्रमाणे परळी शहरात सुरु झालेल्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. लातूर मधील सुप्रसिद्ध ऍडमिशन मेड इझी चे संचालक श्री.सचिन बांगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेले हे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र विद्याथी व पालकांसाठी अतिशय उपयोगी ठरत आहे. अधिक माहितीसाठी संचालक विश्वजीत मुंडे (९१५८३६३२७७) सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here