राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीचं आमंत्रण दिले होते. सभागृहाची गरिमा वाढवण्यासाठी आणि चर्चा संवाद यांचा स्तर उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सर्व पक्षांनी सक्रिय सहकार्य देण्याची गरज असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलून दाखवल.

याच आमंत्रणानुसार काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी या पंतप्रधान मोदी यांना भेटल्या आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली किंवा ही भेट किती वेळ चालली याबाबत कोणताही अधिकचा तपशील समोर आला नाही. ओम बिर्ला यांनी या भेटीचे तसेच इतर पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here