ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करा;सहसंचालकांचे MSBTE ला पत्र, आंदोलनाचे यश – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

गोरख मोरे

प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करा;सहसंचालकांचे MSBTE ला पत्र, आंदोलनाचे यश – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

गणेश ढवळे , मनोज जाधव, शार्दुल देशपांडे यांच्या आंदोलनाला यश

बीड : बीड शासकीय तंत्रनिकेतन मध्ये असणा-या प्रिटिंग टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता षडयंत्र रचुन ६० वरून ३० वर आणण्यात आली होती आणि सदरील शाखा बीड येथुन नाशिक येथे कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याविषयी वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू होत्या त्यामुळेच दि.१४ मार्च २०२२ रोजी माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे,उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, शेतकरी नेते राजेंद्र आमटे ,आप जिल्हाध्यक्ष बीड अशोक येडे, सचिव रामधन जमाले आदिंनी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आदिंना सदर कोर्सची प्रवेश क्षमता ३० वरून पुर्ववत ६० करण्यात यावी याविषयी निवेदन दिले होते.त्याचबरोबर बीड जिल्ह्य़ातील सर्व गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील विद्यार्थी, राजकीय पक्ष,सामजिक संघटना लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा दिला होता.

सहसंचालकांचे MSBTE ला प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करण्याविषयी पत्र;आंदोलनाचे यश :-डाॅ.गणेश ढवळे
_____
सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद उमेश नागदेवे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची गंभीर दखल घेऊन बीडच्या प्रिटींग टेक्नाॅलाॅजी कोर्सची प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करण्यात यावी याबाबत संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी स्वतंत्र लढा देणार:- अड.शार्दुल देशपांडे
______
बीड येथील प्रिटींग टेक्नाॅलाॅजी (मुद्रण तंत्र)पदविका अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे १९९६ पासुन सुरू असून रोजगाराची १०० टक्के हमी देणारा कोर्स महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि बीड येथेच उपलब्ध असून प्रवेश क्षमता ६० वरून ३० वर करत ईतरत्र नाशिक या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या वरीष्ठ स्तरावरील षडयंत्राच्या विरोधात जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी रस्त्यावर व मंत्रालयीन स्तरावर लढा उभारण्यात येईल.

संचालकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा – मनोज जाधव

सहसंचालक यांनी दिलेल्या पत्रा नुसार संचालकने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हा आमच्या सर्वांच्या लढ्याला आलेले यश आहे अशी प्रतिक्रिया मनोज जाधव यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button