गोविंदराव राठोड यांनी परिस्थितीशी झुंज देत आपली सर्व मुले उच्च विद्याविभूषित केली – किशोर नाना हंबर्डे

गोरख मोरे

आष्टी : जागेपणी स्वप्न पाहिली.त्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा केला.गरिबीमुळे शिकता आलं नाही,याची जाणीव ठेवून पाऊल उचलले. पत्नी यशोदा आणि मुलांनी चांगली साथ दिली.त्यामुळेच महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक गोविंदराव राठोड यांनी परिस्थितीशी झुंज देत एक मुलगी कलेक्टर तर दोन मुले डॉक्टर,एक शिक्षण सेवेत उच्चविद्याविभूषित केले.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात सेवापुर्ती कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.त्यांचा सेवा गौरव पुरस्कार पूर्ण पोशाख,हार,सोन्याची अंगठी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे, सरस्वती जाधव मॅडम,डॉ.अभय शिंदे,कलेक्टर कन्या संगीता राठोड,प्रा.ज्ञानेश्वर नवले,लक्ष्मण रेडेकर,उपप्राचार्य अविनाश कंदले,शिवम पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी,गरीब,अपघात पीडित,कोव्हीड मध्ये जीव गमावलेल्याचे पाल्य,अशा विविध ग्रस्त कु.आजबे,कु.मोनिका पोकळे,कु.सोनाली बापू साप्ते,कु.सुकन्या बापू साप्ते,ओमकार राजू आजबे,बबन राजू आजबे,प्रसन्न रमाकांत पोतदार,वैभव बाबासाहेब जोगदंड यांना सचिव उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी महाविद्यालय आणि सहयोग पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला.किशोर नाना हंबर्डे आणि कलेक्टर विद्यार्थिनी संगीता राठोड यांच्या हस्ते कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन यांच्या अजून मारेकरी सापडत नाही या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष व्ही.एल.शिंदे, सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,प्रा.महेश चौरे, माणिकराव लगड, प्रा.शहाजी माने, प्रा.वसंतराव देशमुख,प्रा.अर्जुन राठोड, प्रा.राम हंबर्डे,प्रा.शंकर काकडे,प्रा. भाऊसाहेब ढोबळे,प्रा.दत्तात्रय रेडेकर, प्रा.भवर,मुख्याध्यापक आजबे,भीमराव गायकवाड,नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.सत्काराला गोविंदराव राठोड यांनी उत्तर दिले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुहास गोपने यांनी केले.डॉ.सखाराम वांढरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here