अरुंधती झोपलेली असताना अनिरुद्ध चोर पावलाने तिच्या घरात शिरतो आणि अनिरुद्धचा चांगलाच पानउतारा


‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. देशमुखांचं घर सोडल्यानंतर अरुंधतीने तिच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.अलिकडेच तिला तिचं हक्काचं घर मिळालंय.

अलीकडेच अनिरुद्ध रात्रीच्या वेळी चक्क अरुंधतीच्या घरात चोर पावलाने शिरला होता. यानंतर अरुंधती अनिरुद्धचा चांगलाच पानउतारा करते आणि पुन्हा असं केल्यास पोलिसांना बोलवू असं स्पष्ट शब्दांत सांगते.

सध्या मालिकेचा एका प्रोमो समोर आलाय यात अरुंधती यशला डोक्यावरून पाणी जायला लागल्याचं म्हणते यावर यश तिला घराची एकच किल्ली ठेवण्याचा सल्ला देतो. तर दुसरीकडे यश आप्पांना अरुंधतीच्या घराचे लॉक बदलून घेणार असल्याचं सांगतो हल्ली घरावर लक्ष ठेवून असतात लोक असे तो अनिरुद्धला उपदेश म्हणताना दिसतोय. यशचे हे बोलणं ऐकून संजना अनिरुद्धला काल रात्री नक्की तू गार्डनमध्येच फिऱ्या मारत होतास ना असा प्रश्न विचारताचा त्याचा चेहऱ्या रंग उडतो. तिकडे अरुंधतीची आई तिच्या घरी आलीय.
रात्रीच्या वेळी अरुंधती झोपलेली असताना अनिरुद्ध चोर पावलाने तिच्या घरात शिरकाव करतो. यावेळी घरात कोणी तरी आल्याचा भास झाल्यामुळे अरुंधती यशला फोन करुन बोलावते. विशेष म्हणजे यश आल्यानंतर तो घरात शिरलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळी घरात शिरलेला व्यक्ती कोणी चोर नसून चक्क अनिरुद्ध असल्याचं त्यांना समजतं. त्यानंतर आता अरुंधती अनिरुद्धचा चांगलाच पानउतारा करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here