पत्रकार गोरख मोरे यांची लोकपाल पत्रकार सुरक्षा संघटना बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आष्टी / बीड ( प्रतिनिधी ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील पत्रकार गोरख आप्पाजी मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय , कृषी ,आदी चांगल्या प्रकारे लिखाण केले .
पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व कामाची पावती म्हणून लोक पाल पत्रकार सुरक्षा संघटना बीड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार गोरख मोरे यांची ही निवड श्री प्रदीप गोविंद रोकडे ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ) व श्री भरत शामराव कारंडे ( महाराष्ट्र प्रदेश सचिव ) यांच्या सहीचे निवडीचे पत्र नुकतेच सुपूर्द करण्यात आले .
लोक पाल पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा , पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना , पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी , पत्रकारांवर होणारे हल्ले , धमकी मारहाण व पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलने , उपोषणे , निवेदने , पत्रव्यवहार , सुरू असून आपण ही चळवळ अशीच पुढे न्यावी व पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवावा अशी पत्रात नमूद करण्यात आले असून पुढे पत्रात सांगितले की आपणास लोक पाल पत्रकार सुरक्षा संघटनेच्या अध्यक्ष बीड जिल्हा प्रमुख म्हणून आज भाऊजी नियुक्ती करत आहोत . पत्रकारिते बद्दल आपली तळमळ , अनुभव , काम करण्याची पद्धत , आम्ही जाणून आहोत आपण लोक पालक पत्रकार सुरक्षा , संघटनेच्या कार्याला नक्कीच योगदान द्यल अशी नमूद केले असून , श्री प्रदीप गोविंद रोकडे ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ), श्री भरत श्यामराव कारंडे ( महाराष्ट्र प्रदेश सचिव ), श्री जगन्नाथ जावळे संपादक ठाणे विभाग , श्री संतोष क्षेत्रे ,संपादक अंबरनाथ विभाग , संपादक प्रकाश म्हस्के मुंबई , कार्यकारी संपादक शफिक हवालदार , उपसंपादक अमोल झेंडे , संपादक गणेश शिंदे बीड , संपादक बाळासाहेब धुरंदरे बीड , संपादक संजय सोनवसे बीड , आदी संपादक , पत्रकार, सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय , क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवारांनी लोक पाल पत्रकार सुरक्षा संघटना बीड जिल्हा अध्यक्ष श्री गोरख आप्पाजी मोरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here