दलित स्मशानभूमीवर अतिक्रमण

मौजे धानोरा येथील ग्रामसेवक/ सरपंचाने दलित स्मशानभूमीवर फिरवला जेसीबी
दलित स्मशानभूमीवर अतिक्रमण करून जे काम चालू केले ते तात्काळ बंद करा — दलित समाजाची एक मुखी मागणी

बीड : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील दलित समाजाची गेल्या अनेक वर्षापासून पूर्वजांची स्मशानभूमी आहे . सदर स्मशान भूमी वरती मौजे धानोरा येथील ग्रामसेवक / सरपंचाने अतिक्रमण करून जेसीबी च्या साह्याने सपाटीकरण करून या जागेवरती बांधकाम चालू केले आहे . शासन एकीकडे स्मशानभूमीसाठी निधी देत असून येथील दलितांच्या स्मशानभूमी ला शासनाचा निधी अद्याप मिळालेला नाहीच , परंतु धानोरा येथील ग्रामसेवक / सरपंचाने अतिक्रमण करून या स्मशान भूमी चे सपाटीकरण करून या जागेत बोरिंग ची गाडी आणून बोर घेऊन या जागेवर ती बांधकाम चालू केल्याने येथील दलित बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रताप ग्रामसेवक / सरपंचाने केल्याचे दिसून येत असून सदर स्मशान भूमी वरील जे बांधकाम चालू केले आहे, ते ग्रामसेवक / सरपंचाने त्वरित थांबवावे , सदर स्मशान भूमी वरील अतिक्रमण करून चालू केलेले काम हे तात्काळ बंद न केल्यास , पुढे अघटित घडणाऱ्या घटनेस मौजे धानोरा येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक / सरपंच जबाबदार राहतील असे मौजे धानोरा येथील दलित बांधवा सह पत्रकार गोरख मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एक मुखी मागणी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here