बीड बसमध्ये दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

बीड : येथील बस स्थानकाच्या परिसरात संपामुळे उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये दोरीने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास उघडकीला आली.
निवृत्ती भागुजी आबुज (वय ७०, रा. बाळराजे कॉलनी, शाहूनगर) अशीआत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे.

बीड शहरातील बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या बसमध्ये हा मृतदेह आढळला आहे. गळ्याला फास लावलेल्या व पाय खाली टेकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे हत्या की आत्महत्या ?

स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. दुपारी दीडच्या सुमारास रिकामी असलेल्या बसमध्ये (क्र. एमएच- १४, बीटी २२३७) कोणीतरी इसम लटकेला निदर्शनास आल्यानंतर सफाई कामगार व नागरिकांनी बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राठोड व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. तर विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, आगारप्रमुख निलेश पवार, स्थानक प्रमुख किरण बनसोडे घटनास्थली पोहचले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here