समाजसेवक शरद नवनाथ झोडगे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मान

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

 

बीड : समाज कार्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच गरजूंच्या हाकेला ओ देणारे, तसेच कोरोणा काळामध्ये गोरगरिबांना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणारे व त्यांच्या परीने जेवडी होईल तेवढी मदत करणारे रुग्णसेवक शरद नवनाथ झोडगे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युद्ध आयडॉल समाजरत्न पुरस्कार प्रदान केला.. त्यामुळे एम एस कंट्रक्शन बीड यांच्यावतीने शरद झोडगे यांचा हृदय पुर्वक सत्कार करण्यात आला एम एस कन्ट्रक्शनचे संचालक सातीराम आण्णा ढोले व सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक दादा ढोले पाटील यांच्या वतिने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती व्यसन मुक्ती सेलचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवा माने सर व जेष्ट नेते शेख पाशाभाई, कल्याण ढोले व,विशाल लोंढे, विकी बोराडे
धनंजय सोनकांबळे यांच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here