डॉ.राजकुमार गवळे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

 

लातूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेलच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी डॉ. राजकुमार गवळे यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यांमध्ये व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना व्यसन मुक्त करणे सामाजिक कार्यकर्ते पक्षाशी जोडणे व्यसनमुक्तीच्या उपचाराकरिता काम करणाऱ्या विविध संस्था संघटना व्यसनमुक्ती केंद्र या सर्वांना राज्य पातळीवर एकत्र आणून व्यसनमुक्ती चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न या सेवेच्या माध्यमातून आपण करणार असल्याचे त्यांनी आमच्या सुत्राशीं बोलताना सांगितले आहे. व्यसनमुक्ती सेल मार्फत व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर उपचार व पुनर्वसन करणे यासाठी व्यसनमुक्ती सेल जास्तीत जास्त करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे. यांनी नियुक्ती पत्र देताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेलच्या माध्यमातून आपण पुढे सेल व पक्षाच्या बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करू असे प्रतिपादन डॉ. राजकुमार गवळे यांनी केले विश्वास आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here