हाँगकाँगमध्ये कोरोनाचे थैमान , मृत्युचा तांडव


हाँगकाँगमध्ये दररोज ३४ हजार ते ५५ हजार जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. दोन वर्षापूर्वी चीनच्या वुहान शहरात संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार झाला होता. आता हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हाहाकार सुरू आहे. हाँगकाँगमध्ये धोकादायक पाचव्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेह ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे अंत्यसंस्कारची जागा पुढील एक महिना बूक आहे. यामुळे रुग्णालयातील वॉर्डमध्ये मृतदेह काही काळासाठी सीलबंद केले जात आहेत. चीन मेनलँडमध्येही कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. अशा वेळी जेव्हा भारतात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आपले जीव पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न होत असताना चीनमध्ये पसरणारा संसर्ग नव्या धोक्याचे संकेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घालत आहे. रुग्णांना रुग्णालयात उपचार मिळणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हाँगकाँगला यश आले होते. परंतु २०२१ अखेरिस ७५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये १२ हजार ६५० केसेस आढळल्या होत्या आणि २२० मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झाल्यानंतर परिस्थिती आणखीन बिघडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here