ताज्या बातम्यामुंबई

ठाकरे सरकार दाऊदला पाठिंबा देत आहे का ? – देवेंद्र फडणवीस


मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे.प्रश्न उत्तरांच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे दाऊदशी असणारे संबंध उघड होऊनही त्यांचा राजीनामा का घेण्यात येत नाही आहे असा प्रश्न विचारला. नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंड आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटाशी संल्गन असणाऱ्या व्यक्तीच्या बहिणींशी जमिनीचा गैरव्यवहार केला या आरोपावरून ईडीने अटक केली आहे.

मार्च अखेरपर्यंत त्यांना कारावास सुनावलेला आहे. अनेक निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या बहिणीशी जमिनीचा गैरव्यवहार करणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्या बॉम्बस्फोटात सहभागी असणे होते. म्हणून ठाकरे सरकारने ताबडतोब नवाब मलिकांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यासाठी मोर्चे काढण्यात येत आहे. आज अर्थसंकल्पाच्या सहाव्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात प्रश्न विचारला की ठाकरे सरकार मलिकांचा राजीनामा का घेत नाही आहे ? ठाकरे सरकार दाऊदला पाठिंबा देत आहे का ? असा प्रश्न विचारला असता तातडीने सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *