अन्नतंत्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

 

आष्टी : “जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महिला दिनानिमत्त शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक कला, संरक्षक, संशोधन इ. क्षेत्रातील महिलांचा उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान केला जातो. याप्रसंगी सर्व महिला प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थीनी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. बी. खेमगर उपस्थित होते त्यांनी सद्य स्थितीतील महिलांच्या परिस्थितीविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. प्राचार्य साईनाथ मोहळकर महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अन्न रसायन व पोषण विभाग प्रमुख प्रा. पवार एम. पी., प्रा. गजमल डी. बी. यांनी २०२२ या वर्षीची जागतिक महिला दिनाची थिम “येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता” याविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आशिष पाटील आणि आभार प्रदर्शन प्रा. अडसरे ए. डी. यांनी केले. विद्यार्थीनी इंगळे प्रांजली, बडे प्रतीक्षा यांनी सुद्धा त्यांचे विचार व्यक्त केले. अन्नतंत्र या क्षेत्रामध्ये मुलींची संख्या वाढावी या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलींना संधी मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. यावेळी प्रा. राऊत डी. डी., प्रा. कडभने व्ही.एस, प्रा.चित्ते ए. एस, प्रा. भोपळे एस. जी., प्रा. जोरी डी. बी, प्रा. सभाधिंडे व्ही. एन. प्रा.शर्मा एस.आर., प्रा. देवकर एस पी, प्रा. पाखरे के.एन. प्रा. वाल्हेकर आर. डी.,राऊत ए.एच,अनारसे डी.एम, पठाण एम. बी व इतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here