युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी आज २१३५ भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत बाहेर काढण्यात आलं

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी आज २१३५ भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिली आहे.युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.ऑपरेश गंगा ही मोहिम युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी संजीवनी ठरली आहे. या मोहिमेद्वारे २२ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या विशेष मोहिमेंतर्गत विशेष विमानांद्वारे आजवर १५,९०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलं आहे.दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय दुतावासानं युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना लवकरत हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी ९० आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

हजारो विद्यार्थी अद्यापही युक्रेनच्या पूर्वभागातील कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये अडकून पडले आहेत. अशा भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या भारतीयांना बाहेर काढणं हे सध्या सर्वात मोठं आव्हान असल्याचं भारत सरकारनं शुक्रवारी म्हटलं होतं. युक्रेनमधून सध्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत १३,३०० भारतीय नागरिकांना ६३ विमान फेऱ्यांच्या मदतीनं मायदेशी आणण्यात आलं आहे. यांपैकी गेल्या चोवीस तासात १५ विमानं २,९०० भारतीयांना घेऊन भारतात पोहोचली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here