मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध, पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच- छगन भुजबळ

spot_img

मालेगावच्या २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

मुंबई : मालेगावच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असून मालेगाव शहरातील येणाऱ्या निवडणुकीत महापौर हा राष्ट्रवादीचाच होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मालेगाव मधील विविध पक्षाच्या तब्बल २८ नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील राष्ट्रवादी भवन मध्ये मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, युवकाध्यक्ष मेहबूब शेख,माजी खासदार समीर भुजबळ ,मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख, शिवाजी गर्जे,माजी आमदार शेख रशीद शेख, महापौर ताहेरा शेख,नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना नियमांचे पालन करत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की मालेगाव असेल किंवा नाशिक असेल त्या भागाचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या भागासाठी लागणार निधी तातडीने मंजूर केला जाईल. अल्पसंख्याक समुदायाचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागामार्फत लागणारी सर्व मदत आपणास केली जाईल. आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मालेगाव मध्ये मजबूत होत आहे त्यामुळे पक्ष विस्तारासाठी आणखी जोमाने आपण देखील काम कराल.

नाशिकप्रमाणे भुजबळ साहेब मालेगावचा देखील विकास करतील-अजित पवार

या कार्यक्रमावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भुजबळ साहेबानी नाशिकचा केलेला विकास काही लपून राहिला नाही त्यामुळे जनतेने या भागात विविध क्षेत्रात विकासकामे पहिली आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मालेगावचा देखील अश्याच पद्धतीने विकास होईल. आणि भुजबळ साहेब आणि आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देखील होईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पदाधिकारी यांनी ओळ्खपत्राचे वाटप देखील करण्यात आले.

यावेळी मालेगाव मनपाचे माजी सभागृह नेता अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद, माजी स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, विठ्ठल भिका बर्वे, सलीम अन्वर, नजिर अहमद इरशाद अहमद, मोहम्मद कमरून्नीसा रिजवान, सावंत नंदूकूमार वाल्मीक, सौ. मंगलाबाई धर्मा भारमे, फकीर मोहम्मद शेख सादीक, जैबून्नीसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, हमीदा बी शेख जब्बार, रजिया बेगम अब्दुल मजीद, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, शेख रजिया बी इस्माईल, निहाल अहमद मोहम्मद सुलेमान, फारूक खान फैजूल्ला खान, नुरजहाँ मोहम्मद मुस्तफा, सलीमा बी सैय्यद सलीम, किशवरी अशरफ कुरेशी, यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...