समोरासमोर धडक , दोन ठार सात जखमी

spot_img

सांगली : तासगाव-सांगली रस्त्यावर कवठेएकंदनजीक दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे.

घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. वासुंबे फाट्यापासुन पुढे मांजर्डे (ता. तासगाव) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 10 डीएल 9601) सांगलीहुन तासगावच्या दिशेने जात होते. तर दानोळी (ता. शिरोळ) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 09 डीए 0304) सांगलीच्या दिशेने जात होते.

वरद कोल्ड स्टोअरेजनजीक दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील आठजण जखमी झाले. सर्वांना तात्काळ आपलत्कालीन रुग्णवाहिकेतुन सांगलीतील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अद्याप मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजुस तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील व पथकाने धाव घेतली. ग्रामस्थ व युवकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...