मासिक पाळी येण्यापू्र्वी मूड स्विंग्स होतात का ? हे उपाय ठरू शकतील फायदेशीर

spot_img

How To Deal With PMS : मासिक पाळी (periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक मुलीला, महिलेला आयुष्यात त्याचा सामना करावाच लागतो. महिन्यातील ‘ते’ चार दिवस सर्व महिलांसाठी सारखेच नसतात.

कोणाला कमी त्रास होतो, तर कोणाला जास्त. या काळात पोटदुखी, पाठदुखी, ओटीपोट दुखणं , हेवी फ्लो, अशा अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. पीरियड्स येण्यापूर्वी महिलांमध्ये अनेक संकेत (symptoms) दिसू लागतात, पण काहींमध्ये ही लक्षणे दिसतही नाहीत.

 

काही महिलांमध्ये इमोशनल आणि शारीरिक बदल दिसून येतात. त्यांना प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम असे म्हटले जाते. मासिक पाळी किंवा पीरियड्स येण्यापूर्वी तुम्हालाही मूड स्विंगचा त्रास जाणवत असेल किंवा इमोशनल बदलांचा सामना करावा लागात असेल तर काही उपायांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो

पीएमएस म्हणजे काय ?

 

पीएमएस म्हणजे प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम (Premenstrual syndrome -PMS). बऱ्याच महिला अशा असतात, ज्यांना पाळी सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात. उदा- चिडचिडेपणा, स्तनांमध्ये वेदना होणे, किंवा सूज येणे, इत्यादी. यामुळे दैनंदिन जीवनावर, कामावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. काही स्त्रियांचं तर कामाच लक्षच लागत नाही. साधारणत: ही लक्षणे पाळी सुरू होण्यापूर्वी दिसू लागतात आणि ती सुरू झाल्यावर थांबतात.

 

पीएमएसची लक्षणे कमी करण्यासाठी उपाय

 

1) पाळी सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या मूड स्विंगचे मुख्य कारण म्हणजे, शरीरात होणारा हार्मोनल बद. तो मॅनेज करण्यासाठी तुम्ही डाएट अथवा आहारात बदल केला पाहिजे. अशी वेळी तुम्ही फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि लोह असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. थकवा दूर करण्यासाठी फळांचे सेवन करणेही वाढवले पाहिजे. हिरव्या भाज्या, डाळी, फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यानेही आराम मिळू शकतो.

2) पीएमएसची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही हळद घातलेला चहादेखील पिऊ शकता. कारण त्यामध्ये असलेले कर्क्यूमिन हे वेदना कमी करण्यात प्रभावी असते. तसेच त्यामुळे आपला मूडही सुधारतो.

 

3)पीएमएसची लक्षणे दूर करायची असतील तर तुम्ही मेडिटेशन आणि व्यायामाची मदतही घेऊ शकता. ॲरोबिक्स, सायकलिंग, पोहोणे, जॉगिंग असे विविध प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन रिलीज होते, हे हॅपी हार्मोन्स असतात. त्यामुळे मूड सुधारतो.

 

4) मूड स्विंग होण्यामागे काही शारीरिक समस्यादेखील असू शकतात. सतत थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, असा त्रास असू शकतो. यामुळे वारंवार चिडचिड होते, राग येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमच्या सप्लीमेंट्सचे सेवन करू शकता. त्यामुळे मूड स्विंगचा प्रभाव कमी होऊ शकतो. मात्र या सप्लीमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, स्वत:च्या मनाने नव्हेत.

 

5) अशा काळात बिलकूल स्ट्रेस घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी आराम करा. ध्यान करणे, योगासने करावीत. यामुळे इमोशनल संतुलन सुधारण्यास मदत मिळते.

5) अशा काळात बिलकूल स्ट्रेस घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी आराम करा. ध्यान करणे, योगासने करावीत. यामुळे इमोशनल संतुलन सुधारण्यास मदत मिळते.

 

6) प्रक्रिया केलेले, पॅक केलेले, जास्त मीठ असलेले अन्न पदार्थ खाणे टाळावे. मीठामुळे ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वॉटर रिटेंशन, अंग दुखणे, शरीरावर सूज येणे असा त्रासही होऊ शकतो.

 

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

 

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...