#INDvPAK : पाकचा उसामा मिर ठरणार Team India ची डोकेदुखी

0
81
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

लाहोर :- मुद्दसर नझरपासून आताच्या बाबर आझमपर्यंत वादळी फलंदाजी करणारे सलामीवीर फलंदाज पाकिस्तानसाठी सातत्याने यशस्वी ठरले आहेत. असाच एक खास प्रयोग पाकिस्तान संघ आगामी आशिया करंडक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत करणार आहे.

पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्याने वादळी फलंदाजी करत नावारूपाला येत असलेला उसामा मीर हा युवा अष्टपैलू त्यांनी संघात घेतला असून तोच भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. अर्थात, हे त्याचे पदार्पण नसले तरीही अद्याप त्याच्या खेळाचा अंदाज भारतीय संघाला मिळालेला नाही.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशिया करंडक तसेच त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध होत असलेल्या मालिकेसाठी उसामाला संघात स्थान दिले आहे. पाकिस्तानच्या निवड समितीने विश्‍वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोरवर ठेवत संघात उसामाची निवड केली आहे. आशिया करंडक स्पर्धेत उसामा भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीसीएल) त्याने अफलातून कामगिरी केली आहे. पीएसएलमध्ये सातत्याने धावा केल्या तसेच बळीही मिळवल्याने तो चर्चेत आला. मुलतान सुलतान या संघाकडून खेळत असलेल्या उसामाने आपले अष्टपैलुत्वही सातत्याने सिद्ध केले आहे. उसामा याने मे महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पदार्पण करताना गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.

पाकिस्तान संघ –

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, महंमद रिझवान, महंमद हॅरिस, महंमद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, महंमद वसीम ज्युनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here