कर्करोगावर सापडला इलाज! या नवीन औषधामुळे मुळापासून नष्ट होईल ट्यूमर

spot_img

कर्करोग हा आजही प्राणघातक आजार आहे. आजपर्यंत असे कोणतेही औषध बनलेले नाही ज्यामुळे हा आजार कायमचा दूर होईल. मात्र, आता कर्करोगाच्या उपचारात आशा निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी एका औषध चाचणीत दावा केला आहे की एक औषध शरीरातील निरोगी पेशींना हानी न पोहोचवता कर्करोगाच्या ट्यूमरला मुळापासून नष्ट करू शकतो.

या औषधाला AOH 1996 असे नाव देण्यात आले आहे. हे कर्करोगाच्या पेशींमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांना लक्ष्य करते. या कॅन्सर प्रोटीनमुळेच ट्यूमर शरीरात पसरतो आणि वाढतो. याआधी हे प्रोटीन – प्रोलिफेरेटिंग सेल न्यूक्लियर अँटीजेन (PCNA) – हे उपचार करण्यायोग्य मानले जात नव्हते, परंतु आता नवीन औषध त्यावर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठ्या कर्करोग केंद्रांपैकी एक असलेल्या लॉस एंजेलिसमधील सिटी ऑफ होप हॉस्पिटलने 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध विकसित केले आहे. चाचणीत या औषधाचे चांगले परिणाम आल्यानंतर जगभरातील कर्करोगग्रस्तांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

या औषधाची प्रयोगशाळेत 70 प्रकारच्या कर्करोगावर चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये स्तनाचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग यावर चाचण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या ट्यूमरवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. औषध विकसित करणाऱ्या प्रोफेसर लिंडा मलकास सांगतात की, हे औषध कॅन्सरमधील प्रोटीन्स नष्ट करण्यात मदत करते. शरीरातील कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करते आणि ट्यूमरच्या वाढीमध्ये अडथळा बनण्यासोबतच त्याचा नाशही करते.

या औषधावर संशोधन करणाऱ्या टीमला असे आढळून आले आहे की AOH 1996 कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये पेशींच्या वाढीच्या आणि प्रसाराच्या सामान्य मार्गात व्यत्यय आणते. हे कर्करोगाच्या पेशींना मारण्याचेही काम करते. या दरम्यान, हे निरोगी पेशींवर हल्ला करत नाही, तर कर्करोगाच्या उपचारादरम्यान, केमोथेरपी उपचाराने देखील रुग्णांच्या चांगल्या पेशी नष्ट होतात, ज्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे केस गळणे, चेहरा काळवंडणे आणि पोट खराब होणे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.

आता या औषधाचे संशोधन केवळ सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सध्या त्याची मानवांवर पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास कर्करोगाच्या उपचारात मोठी क्रांती होऊ शकते. संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कर्करोगाच्या पेशी नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध लागला आहे. हे औषध मानवांवरही प्रभावी ठरले, तर भविष्यात कर्करोगाचा धोका खूप कमी होईल.

लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी नवगण न्युज 24 घेत नाही

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...