चेंबूर येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात बुरख्यावर बंदी !

0
120
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

चेंबूर : येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी मुसलमान विद्यार्थिनी आक्रमक झाल्या असून त्यांनी येथे आंदोलन केले.

यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महाविद्यालय प्रशासनाने ‘महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बुरखा काढून मग आत यावे’, अशी भूमिका घेतली आहे, तर ‘महाविद्यालयात आम्हाला एखादी जागा द्या, तेथे आम्ही बुरखा काढून वर्गात येऊ’, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. या प्रकरणी ‘चर्चा करून भूमिका जाहीर करू’, असे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

बुरख्यावर बंदी घातली की, कट्टर मुसलमान विद्यार्थिनी आक्रमक होऊन त्यास विरोध करतात. दुसरीकडे टिळा, टिकली, कुंकू, मेंदी अशा हिंदु चिन्हांवर बंदी घातल्यास हिंदु विद्यार्थी-विद्यार्थिनी निमूटपणे गप्प बसतात. धर्माभिमानशून्य हिंदूंसाठी हे लज्जास्पदच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here