क्राईम

लहान भावानेच का केला मोठ्या भावाचा खून?


नाशिक : मालमत्तेच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. उपनगर येथे रामदास स्वामी नगर येथील मानस अपार्टमेंट बिल्डिंग नंबर १ मध्ये ही घटना घडली. या दोन भावांमध्ये सुरुवातीला वाद झाला नंतर हाणामारी झाली.

त्यानंतर संतप्त झालेल्या लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याने धारदार वस्तूने व दगडी वरवंडा टाकून मोठ्या भावाचा खून केला.

सोमवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. मोठा भाऊ मयंक चंद्रकांत जाधव आणि त्याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये फ्लॅट विक्रीच्या कारणावरून भांडण झाले व ते शेवटी प्रकरण खूनापर्यंत गेले.

या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर लहान भाऊ आकाश जधाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *