क्राईम

सूनेचं सासऱ्यासोबत अफेअर; सासूला गोळ्या देऊन रोज रात्री..


लखनऊ : अनेकदा लोक नात्याचंही भान ठेवत नाहीत आणि असं काही करतात, जे सगळ्यांनाच हादरवून सोडतं. क्राईम रिकॉल सीरीज अंतर्गत, आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगत आहोत, ज्याची या वर्षात खूप चर्चा झाली आणि ज्याने नातेसंबंधही कलंकित केले.

झाशीच्या टोडीफतेहपूर पोलीस स्टेशन परिसरात नात्याच्या मर्यादा ओलांडल्याची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. यात सासऱ्याचे सावत्र सुनेशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी सासूने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. ही बाब उघडकीस येताच कुटुंबात वाद सुरू झाला. या वादाला कंटाळून सासऱ्याने शेवटी विष प्राशन केलं. त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेले. मात्र, त्यांचं निधन झालं.

टोडीफतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गावकऱ्याच्या पत्नीचा 20 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. गाता गावातील एका विधवा महिलेशी त्याने दुसरं लग्न केलं. महिलेला पाच वर्षांचा मुलगा होता. मुलगा मोठा झाल्यावर त्याचं लग्न झालं. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, लग्नानंतरच मुलगा दिल्लीला पैसे कमावायला गेला होता. गेल्या तीन वर्षांपासून सून या घरात सासरच्या मंडळींसोबत राहत होती. या काळात सासरे आणि सून यांचे संबंध निर्माण झाले. शेजाऱ्यांनी या दोघांच्या नात्याची माहिती सासूला दिली. यानंतर सासूने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं.

यानंतर घरात तिघांमध्ये मोठा वाद झाला. रागावून सासू आई-वडिलांच्या घरी परतली. ही गोष्ट तिने आपल्या मुलाला सांगितली. मुलगाही दिल्लीहून परत आला. अनैतिक संबंध उघड झाल्यावर घरात मोठा वाद झाला. यामुळे सासऱ्याने भरपूर दारू प्यायली. त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं. पत्नीला फोन करून विष प्राशन केल्याचं सांगितलं. ती घरी पोहोचली तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. कुटुंबीयांनी त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेलं. मात्र, सासऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

सासू शवविच्छेदनगृहात पोहोचली आणि म्हणाली की, सासरच्या घरी आल्यावर काही दिवसातच सुनेनं वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलगा दिल्लीला कमावायला गेला. यादरम्यान तिच्या पतीचे तिच्या सुनेशी संबंध जुळले. दोघांची परस्पर संमती होती. सासरे आणि सून दोघेही एकत्र बसून दारू प्यायचे. सून रोज सासूला झोपेच्या गोळ्या द्यायची. जेव्हा सासूने सूनेला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं त्यानंतर तिने सासूला तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. सुनेला आपल्या सासऱ्यांसोबतच राहायचं होतं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *