पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने,पतीवरच केला ॲसिड हल्ला

spot_img

नागपूर : पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केला व त्यात पती गंभीर जखमी झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

धीरज भीमराव जयपुरे (४४, विठ्ठलनगर) असे जखमी पतीचे नाव आहे. तो भाजीविक्रेता आहे. त्याचे काही वर्षांअगोदर लग्न झाले होते व पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. त्याने तीन वर्षांअगोदर किरणसोबत (२७) दुसरे लग्न केले होते. किरणचेदेखील हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच किरण धीरजवर संशय घेऊन लागली. लहानलहान गोष्टींवरून त्यांच्यात वाद सुरू झाले व दुरावा वाढत गेला. ११ महिन्यांअगोदर ती वर्धा येथे तिच्या माहेरी गेली. धीरजने खूप विनंती करूनदेखील ती परतली नाही. अखेर धीरजने तिला नोटीस पाठवली होती. त्यामुळे ती नाराज होती. तिने अखेर घरी परत येण्याची तयारी दाखवली व १ डिसेंबर रोजी ती परतली. गुरुवारी सकाळी धीरज भाजी विकण्यासाठी घरून निघाला.

रात्री साडेआठ वाजता तो परतला व थकला असल्याने त्याने तिला चहा करायला सांगितले. त्यावेळी तो पलंगावर झोपून आपला मोबाईल पाहत होता. किरणने त्याला पलंगाच्या दुसऱ्या कडेला झोपायला सांगितले. धीरजने तसे केल्यावर अनपेक्षितपणे तिने त्याच्यावर ॲसिड फेकले. धीरजने तिला हाताने थांबवले व त्याच्या चेहऱ्याऐवजी अंगावर ॲसिड पडले. त्यात तो भाजला. त्यानंतर परत किरणने त्याच्या दिशेने ॲसिड पडले. त्याच्या डोळ्यालादेखील यात जखम झाली. वेदनेने धीरज ओरडत असताना किरणने घरातून पळ काढला. त्याच अवस्थेत धीरजने अजनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेले. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती देण्यात आले. धीरजच्या तक्रारीवरून किरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...