क्राईम

ग्राहकाची चक्क पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत गोळीबळ…


पुणे : पुण्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने चक्क पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. तसेच रागात त्याने हवेत फायरिंग केल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्याजवळील वाघोली परिसरात वाघेश्वर मंदिराजवळ हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. आरोपी चेतन पडवळ याने काल (24 ऑक्टोबर) रात्री उशिरा ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर टाकली होती. त्याची पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर आरोपीने रोहितला मारहाण केली.

या महाराणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण केली. आरोपीने सर्वांना घाबरवण्यासाठी त्याच्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केली. त्यामुळे सर्वजण घाबरुन पळून गेले.प्रकाराची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय‌.पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *