क्राईम

आसाराम बापू ला ,का मिळाला नाही अद्याप जामीन?


आसाराम बापूला अटक झाली. गेल्या दहा वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्येच आहे. अजूनही सुटकेची कोणतीही संधी दिसत नाही.

आसाराम बापूला जेलमध्ये १२० महिने म्हणजे दहा वर्षे पूर्ण झालीत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १५ वेळा जामीन अर्ज पाठवला. पण, अद्याप जामीन मिळाला नाही. आसाराम बापूने राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी आणि सलमान खुर्शीदसारखे प्रसिद्ध वकिलांची फौज उतरवली. पण, जोधपूर मध्यवर्ती जेलचा दरवाजा काही आसाराम बापूसाठी खुला झाला नाही.

३१ ऑगस्ट २०१३

३१ ऑगस्ट २०१३ ला आसाराम बापूला अटक झाली. तेव्हापासून आसाराम बापूला खुली हवा मिळाली नाही. दरम्यान जोधपूर जेलमधून कितीतरी आरोपींना सुटका झाली. पण, आसाराम बापूसाठी जोधपूर जेल मुक्कामी ठरली. सलमान खान तीन दिवसांत जोधपूर जेलमधून बाहेर आला. पण, आसाराम बापू गेल्या दहा वर्षांपासून अद्याप जेलमध्येच आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात आसाराम बापू जेलमध्ये आहे. १५ वेळा आसाराम बापूकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आले. मात्र, अद्याप जामीन मिळाला नाही. आता शेवटची आशा गुजरात उच्च न्यायालयावर आहे. पण, यावर केव्हा निर्णय होणार, हे सांगणे कठीण आहे.

८२ वर्षांचा आसाराम बापू

आसाराम बापूचा जन्म १७ एप्रिल १९४१ ला झाला. वयाचा दाखला देऊन जामिनासाठी अर्ज केला. पण, न्यायालयाने आसाराम बापूवर दया दाखवली नाही. जन्मठेपेची शिक्षा झालेले अमरमणी त्रिपाठी, आनंद मोहनसह इतर आरोपी जेलबाहेर आले. मात्र, आसाराम बापूला अद्याप जामीन मिळाला नाही. आसाराम बापू ६४ वर्षांचा असताना २१ वर्षीय मुलीवर त्याने अत्याचार केला होता. एक नव्हे तर दोन बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू सापडला आहे.
१०१२ पानांचे आरोपपत्र

आसाराम बापूविरोधात १४ गुन्ह्यांतर्गत आरोप सुरू आहेत. १ हजार १२ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. १४० जणांची साक्ष झाली. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला पूर्णवेळ जेलमध्ये ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *