पुणे : 25 वर्षीय तरुणाची अल्पवयीन मुलांकडून निर्घृणपणे हत्या

0
229
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

 

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्याच्या वानवडी परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आले आहे. काही अल्पवयीन तरुणांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्याप हा खून का करण्यात आला याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, महादेव रघुनाथ मोरे वय वर्षे 25 असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा पाच अल्पवयीन मुलांकडून खून झाल्याचे म्हणले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप या खुणाची कबुली देण्यात आलेली नाही. कोणाची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. तर आरोपी फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची कारवाई करत पाच मुलांना ताब्यात घेतले.

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणेकरांना हादरवून सोडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अशीच एक खुणाची घटना घडली होती. नितीन मस्के या तरुणाची चित्रपट पाहून बाहेर पडताच हत्या करण्यात आली होती. काही तरुणांनी मिळून नितीनवर चाकूने वार केले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे वापरून नितीनला संपविण्यात आले होते. त्यानंतर या घटनेला काही दिवस होताच जातात पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

सध्याच्या तरुणांमध्ये सळसळते रक्त असल्यामुळे त्यांना आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे अशक्य होत आहे. अशा अनेक घटनांमध्ये तरुणांना कौन्सिलिंगची गरज असल्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही घटना तर अनेक शिल्लक कारणावरून घडल्या आहेत. ज्यामध्ये नंतर टोकाचे पाऊल उचलले गेले आहे. मात्र राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here